हिंगणघाट : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करीत कायदेशीर मंडळी जमवून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या नरेश श्याम पवार, शोभा पवार, गजानन बेळूरकर, राधिका पवार, कुमुद फुलमाळी यांना स्थानिक जिल्हा व॒ अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपातून मुक्त करीत त्यांची निर्दोष मुक्तता केली.
पोलीस कर्मचारी विजय हुलके हे वडनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना २५ एप्रिल २०१४ मध्ये सायंकाळच्या सुमारास समन्स बजावण्याच्या कामासाठी आजनगांवकडे जात होता. दरम्यान सोनेगांव पुलाजवळ दोघे जण दारू घेऊन जाताना दिसले होते. हुलके याने पाठलाग केला असता नरेश पवार याने इतरांना बोलावून हुलके यांच्यावर हल्ला चढवून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत मारहाण केली होती.
याप्रकरणी हुलके यांनी वडनेर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपी नरेश पवार, शोभा पवार, गजानन बेळूरकर, राधिका पवार आणि कुमुद सरसू फुलमाळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. न्यायाधीशांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. आरोपी पक्षाकडून अँड. इब्राहिम हबीब बख्श यांनी काम पाहिले. त्यांनी आरोपपत्रातील अनेक त्रुटी न्यायालयासमोर सादर करून ही तक्रार खोटी असल्याचे सिद्ध केले. दोन्ही
पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी नरेश पवार, शोभा पदार, गजानन बेळूरकर, अधिका काश्मीर पवार आणि कुमुद सरसू फुलमाळी यांची निर्दोष मुक्तता केल्याने त्यांनी न्यायालयाचे आभार मानले.