

पवनार : नवरात्री उत्सवानिमित्त पवनारतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना कर्तुत्ववान नारी म्हणून सन्मानित करण्यात आले.मैत्याराणी नवरात्री उत्सव समितीचे वतीने हा अभिनय उपक्रम राबविण्यात याला असून यात सामाजिक राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शालिनी आदमने. ईंदू हुलके, मालती तलवेकर, शकुंतला नगराळे, जयश्री भट, संगीता डगवार, अनिता मुंगले, संगीता झाडे,संगीता पाटील या महिलांना सामजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमिरे, लोकमत सखी मंच च्या संगीता बावनेर यांचे हस्ते सन्मान पत्र.व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर यामिनी जवादे, छाया हेडाऊ, वंदना बोकडे, मालती तळवेकर, रोशनी खेलकर, शालिनी आदमणें, हजर होत्या.सूत्र संचालन गीता इखार, राधा डगवार ह्यांनी केले तर आभार वैष्णवी काळभांडे हिने मानले.यशस्वी आयोजनासाठी सुभाष पाटील, सुरेश इखार, जयंत गोमासे, अनुप चंदनखेडे नितीन भोयर, विजय आंबटकर, रवी कोसे, पप्पू भोयर, जाणीक काळभांडे,अमोल घुगरे, यांनी परिश्रम घेतले.