

वर्धा : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी (ता. ३) विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनात आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या शौर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच राष्ट्रसेवेप्रती आपली बांधिलकी दृढ करण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रसंगी प्रा. अवधेश कुमार, डॉ. एच. ए. हुनगुंद, डॉ. राकेश मिश्र, डॉ. जयंत उपाध्यक्ष, डॉ. रवि कुमार, डॉ. आर. पी. यादव, डॉ. हिमांशु शेखर, डॉ. श्रीनिकेतन मिश्र, डॉ. मैत्रेयी, डॉ. रणंजय सिंह, डॉ. देवेंद्र कुमार, डॉ. दत्तूराम देवूने, डॉ. तेजस्वी एच. आर., विनोद वैद्य, बी. एस. मिरगे, संगीता मालवीय, सुधीर खरकटे, प्रभाकर राय, भोला, श्रीवास आदी उपस्थित होते.


























































