रखडले अनुदान ३ ९ ४ आंतरजातीय जोडप्यांकरिता हवे एक कोटी ७३ लाख : शासनाकडून अद्याप पुरवठा नाही

वर्धा : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून मदत म्हणून अनुदान देण्यात येते . याकरिता जोडप्यांना विवाह आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे अनिवार्य आहे . वर्ध्यात असे अर्ज करूनही अद्यापही सानुग्रह अनुदान मिळाले नाही . अनुदानाकरिता जिल्हा परिषद प्रशासनाकडून होणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे . मात्र केंद्र व राज्य शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नसल्याने या जोडप्यांची प्रतीक्षा कायम आहे .

जातीभेद नष्ट करण्याकरिता शासनाकडून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता सानुग्रह मदत म्हणून अनुदान देण्याचा निर्णय घेतला . काही रोख आणि काही वस्तू स्वरूपात हे अनुदान देण्यात येते . याकरिता आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना विविध कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज करण्याची गरज आहे .

असा अर्ज केल्यानंतर त्याची छाननी करून खऱ्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा नियम वर्ध्यात अर्ज करणाऱ्या सर्वच लाभाथ्यांची निवड अनुदानाकरिता करण्यात आली . गत चार वर्षांपासून अनुदानासाठी लाभार्थ्यांची निवड होते . पण शासनाकडून अनुदानच येत नाही . यामुळे योजनेत असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या या दिरंगाईमळे अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे .

वर्धा जिल्ह्यात योजनेच्या लाभासाठी या चार वर्षांत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३ ९ ४ एवढी झाली आहे . या लाभाथ्यांना अनुदान वितरित करण्याकरिता केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून एकूण एक कोटी ७३ लाख रुपयांची गरज आहे . त्याची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे . असे असले तरी अद्यापही रक्कम मिळाली नाही . यामुळे ही योजना वध्यति गत काही दिवसांपासून कागदावरच असल्याचे दिसून आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here