खोटे कागदपत्रे दाखवून घरावर कब्जा! पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : घरमालक जिवंत असताना मयत झाल्याचे खोटे कागदपत्र आर्वी नगर परिषदेत दाखल केले. घरावर पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख रुपये उचलून घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आवी येथील खडकपुरा वॉर्ड नवीन बालाजी वाॅर्डातून उजेडात आली आहे. याप्रकरणी पती व पत्नी अशा दोघांविरुद्ध आर्वी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश आनंदराव सुरजुसे (60) हे नुकतेच वरुड तहसील येथून मंडळ अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे मुळ गाव जुना खडकपुरा वॉर्ड बालाजी वॉर्ड, आर्वी आहे. पण नोकरीनिमित्त ते 30 ऑक्टोबर 1981 पासून बाहेरगावी राहतात. गणेश सुरजुसे यांनी खडकपुरा येथे डोमा धनु सुरजुसे व ओंकार डोमा सुरजुसे रा.जळगाव बेलोरा याच्याकडून 27 मे 2020 रोजी खरेदी केले. त्यानंतर 29 डिसेंबर 2020 रोजी नगर परिषद, आवी येथे लिपिकाकडे घर टॅक्स भरण्याकरिता गेले असता त्यांच्या नावाचे घरच नसल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी नपकडे फिर्यादीने लेखी तक्रार देऊन जुने रेकॉर्ड दाखविले. नपकडे घराचे पूर्ण कागदपत्रे दाखल केले. त्यानंतर तीन महिन्यांनी नपने 9 मार्च 2021 रोजी सदरची मालमत्ता फिर्यादीच्या नावावर करून दिल्याचे घरटॅक्स पावती असेसमेंट नक्कल प्रमाणपत्र चालान पावती असे कागदपत्र दिले.

नंतर 2 मार्च 2022 रोजी चालू वर्षाचा टॅक्स भरण्याकरिता नगर परिषद, आर्वी येथे गेकळ असता टॅक्स भरल्याची पावती घेऊन गेले. तेथे गेले असता घराला शोभा मारोतराव सुरजुसे यांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजनेचे बोर्ड दिसले. त्यावर 2 लाख 50 हजार रुपये घरावर घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादीने चौकशीकरिता नगरपालिकेत जाऊन विचारणा केली असता आरोपी मारोतराव परसराम सुरजुसे याने तुम्ही 15 एप्रिल 2009 रोजी मयत झाल्याबाबतचे प्रमाणपत्र 16 सप्टेबर 2009 रोजी तहसीलदार यांचे मयत झाल्याचे प्रमाणपत्र देऊन मारोतराव सुरजुसे हे एकटेच वारस असल्याचे प्रतिज्ञापत्र व सुनील सोमनाथ वाजपेयी सदस्य न.प. यांचे 15 एप्रिल 2009 रोजी मयत झाल्याचे व एकटेच वारस असल्याचे बारसान प्रमाणपत्रसुद्धा दिले. या प्रमाणपत्रावरून घर रितसर आरोपीच्या नावावर झाल्याबाबत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here