रात्री कोणी बीमार पडु नये ? खाजगी डाॅक्टर राहतात नाॅटरिचेबल! पालिकेचे शहर मात्र रात्री औषधालाही डाॅक्टर शोधुनही सापडे ना

मोहन सुरकार : राष्ट्रहित न्यूज

सिंदी : पालिकेच्या पंधरा ते वीस हजार लोकसंख्येच्या सिंदी शहरात मध्य रात्री कोणाची आकस्मिक प्रकृती बिघडली तर त्याला औषधालाही खाजगी डाॅक्टर शोधुनही सापडत नाही. दहा दहा खाजगी डाॅक्टरांचे दवाखाने थाटले असतांना एकही डाॅक्टर रात्री सेवा देत नाही. ऐवढेच नाही तर हे डाॅक्टर रात्री चक्क नाॅटरिचेबल राहतात. ऐवढ्या मोठ्या शहरात अनेक परिवाराचे हेच डाॅक्टर “फॅमिली डाॅक्टर” आहे. तरी रात्री सेवा देण्यात असमर्थता दर्शवितात याचेच सर्व रहीवाशी आश्चर्य व्यक्त करतात.

नुकतेच संपूर्ण जग कोरोना सारख्या माहामारीतुन गेले आहे प्रकृर्ती काय असते….वेळीच उपचार नाही मिळाले तर काय होते…. मरन काय असते हे…. आपण सर्वानी याची डोळा पाहले आहे त्यामुळे सर्वत्र प्रकृती बाबत जागृकता वाढली आहे. गोर-गरीब परिवार सुध्दा थोडी जरी प्रकृती अस्वस्थ वाटली तरी ताबडतोब डाॅक्टरकडे धाव घेतो अशा परिस्थितीत नगर पालीकेचे शहर असलेल्या १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या शहरात एकही खाजगी डाॅक्टर रात्री उपलब्ध नसने याला शोंकातीकाच म्हणावी लागेल.

शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे खर्चटल्यावर मलमपट्टी करणारा थातूरमातूर दवाखाना अशी ओळख निर्माण झाली आहे शिवाय येथे दिवसाच सुयोग्य उपचार मिळने कठीण असल्याने रात्रीचा विचारच न केलेलाच बरा असे शहरातील अनेक नागरीक आपल्या अनुभवातुन सांगतात अशा परिस्थितीत सर्वाची आशा असते ती ज्यांच्याकडे आपण सर्व परिवारातील सदस्य अनेक वर्षांपासून उपचार घेतो त्याच्याकडे….!

मात्र शहरातील सर्वच्या सर्व खाजगी डाॅक्टरनी एक अलिखित नियमच बनवुन टाकला आहे कि मी शहरात दिवसभर डाॅक्टरी व्यवसाय करणार मात्र रात्री आपली सेवा उपलब्ध करू शकणार नाही. वाटल्यास सकाळी दवाखाना उघडल्यावर उपचार देणार……यात शहरातील एखाद्या परिवारातील वृद्धाची (म्हातार्‍याची) किवा लहान चिमुकल्याची अथवा महीलेची तब्बेत रात्री अपरात्री बिघडली तर त्या परिवारा समोर मोठा बिकट प्रसंगच उभा राहतो कारण खाजगी डाॅक्टर नाॅटरिचेबल असतो. आता काय करावे काय नाही अशा द्विधा मनस्थितीत कितेकदा पेंशन्टला किरायाची गाडी करुन सेवाग्राम हॉस्पिटलला नेले मात्र तेथे नाॅरमल प्रॉब्लेम म्हणुन आल्या पावली परत यावे लागले. यात त्या परिवाराचा वेळ पैसा आणि मनसिक त्रास वाचु शकला असता जर पारिवारीक डाॅक्टर उपलब्ध झाला असता तर….. करिता सर्व सिंदीवासीयांची शहरातील सर्व खाजगी डाॅक्टरनी रात्रीला सुध्दा आपली सेवा उपलब्ध करावी. सिंदीवासीयांची अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here