क्षुल्लक वादातून व्यक्तीस लोखंडी रॉडने मारहाण

आर्वी : क्षुल्लक वादातून एकास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. रहिमाबाद शिवारात ही घटना घडली. विशाल कदम हा रात्री शेतात जात असताना एक ट्रॅक्‍टर शेतातून जाताना दिसला. विशालने त्यास हटकले असता विजय कदम याने त्यास कट मारला. तसेच यापुढे हटकले तर जीव घेईन असे म्हणत रॉडने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी आर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here