मेहुण्याने केली जावयाची हत्या! आरोपी अटकेत; बहिणीला मारहाणीचा वाद गेळा विकोपाला

वर्धा : बहिणीला नेहमी मानसिक त्रास देत मारहाण का करता असे म्हणत मेहुण्याने थेट जावयावर चाकू हल्ला करीत त्यास जीवानिशी ठार केल्याची घटना स्थानिक पुलफैल भागात रविवारी दुपारी घडली. या प्रकरणातील आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अमीत निमसडे (२८) यांची पत्नी पतीच्या जाचाला वैतागुन मागील काही महिन्यांपासून माहेरी राहत होती. अशातच अजय भुरे रा. पुलफैल याने अमीत याला त्याच्या घराच्या शोजारीच वाटेत अडवून तु माझ्या बहिणीला वारंवार मानसिक व शारिरीक त्रास का देतो असे म्हणत त्याच्याशी वाद केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने जवळ असलेल्या चाकूने अमीतवर हल्ला करून त्याला जीवानिशी ठार केले. हत्येची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अजय भुरे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 30२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी आपल्या हालचालींना गती देत आरोपीला अवघ्या काही तासांच्या आतच ताब्यात घेत जेरबंद केले. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here