पवनार येथे धाम नदीत अद्यात इसमाची आत्महत्या : सेवाग्राम पोलिसात घटनेची नोंद

पवनार : येथे धाम नदीवर आश्रम कडे जाणाऱ्या पुलाखाली एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना रविवार (ता १६) सकाळी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे वय अंदाजे ४० वर्षे असल्याची माहिती मिळाली.

सदर इसम हा पवनार गावात पाच ते सहा दिवसांपासून फिरत होता. त्याची मानसीक अवस्था ठिक नसल्याची माहिती मिळाली त्यातूनच या इसमाने आत्महत्या केली असेल असे सांगण्यात येत असले तरी आत्महत्तेचे कारण अद्याप कळू शकले नाही.

या घटनेची माहिती पवनार येथील पोलीस पाटील आम्रपाली ढोले यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येत सदर घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह नदीतुन बाहेर काढला. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम सुरजुसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री चोऊबे, हवालदार वैशाली करमरकर हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here