आंदोलकांनी पालकमंत्री सुनील केदार यांच्या वाहनाचा ताफा अडवीला! सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे आंदोलन

पवनार : लॉकडाउनचा फटका सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिकांनाही बसला आहे परिणामी संतप्त आंदोलकांनी या व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यासह इतर मागण्यांसाठी पालकमंत्री सुनील केदार यांच्या वाहनांचा ताफा अडवून मागण्या मांडल्याची घटना पवनार जवळ घडली. पालकमंत्र्यांचा ताफा अडवताच परिसरात एकच खळबळ निर्माण झाली होती.

पालकमंत्री सुनील केदार नागपूरहुन वर्ध्याला येत असताना पवनार गावाजवळ आंदोलकांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडवला. सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीन हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री केदार यांनी वाहनातून उतरत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी आंदोलकांनी आपली भूमीका मांडत आत्महत्याग्रस्त सलून दुकानदारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, सलून ब्युटी पार्लर दुकानदार, कारागीरांना स्वतंत्र पॅकेज देत महिन्याला सात हजार रुपये द्यावे, लॉकडाउन काळातील दुकानभाडे, वीज बिल माफ करावं, सुरक्षा इन्शुरन्स कवच, फ्रंटलाईन दर्जा देत लस द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जवळपास दहा मिनिट हे आंदोलन चालले त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here