
आर्वी : नालीत पडून इसमाचा मृत्यू झाला. ही घटना माहेश्वरी मार्गावर घडली. प्रेम रामकिसन चावरे (४६) रा. वाल्मिक वॉर्ड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रेम चावरे हा आर्वी नगरपालिकेत कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. तो मद्यधुंद अवस्थेत नालीच्या काठावर बसून असताना त्याचा अचानक तोल जावून तो नालीत पडला. यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
















































