Home ◼️ संपादकीय देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या कंपनीत ब्लास्ट! दोन कामगार गंभीर जखमी

देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या कंपनीत ब्लास्ट! दोन कामगार गंभीर जखमी

वर्धा : देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टील कारखान्यातील तीन नंबरच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन कामगार गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी सकाळ पाळी सुरू झाल्यानंतर स्टील कंपनीच्या तीन नंबरच्या भट्टीत अचानक ब्लास्ट झाला. भट्टीतील लोखंडाचा तप्त रस बाहेर फेकला गेल्याने कामगार नरेंद्र सत्यदेव सिंग व अजयकुमार यादव हे गंभीर जखमी झाले. जखमी अजयकुमार यादव यांना नागपूर येथील, तर नरेंद्र सत्यदेव सिंग यांना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!