दहेगाव टी-पॉइंटवरील गतिरोधक ठरताहेत अपघातास कारणीभूत! तीन महिन्यांत चार अपघात; मंगळवारीही ट्रकची धडक

चिकणी (जामणी) : दहेगाव (स्टेशन) गावालगत वर्धा-मेहकर-औरंगाबाद महामार्ग गेला आहे. याच महामार्गाला देवळी-पुलगाव मार्ग जोडण्यात आला आहे. यामुळे येथे टी-पॉइंट तयार झाला आहे. यासाठी भरधाव वाहनांचा वेग कमी करण्याकरिता येथे सलग तीन-तीन गतिरोधक तयार करण्यात आले. हे गतिरोधक दुरून दिसत नसल्याने येथे वारंवार अपघात होतो.

तीन महिन्यांमध्ये चार अपघात झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी येथे बस, कार व ट्रक असा तिहेरी अपघात झाला होता. तेव्हा कार आणि बसमधीलप्रवासी जखमी झाले होते. मंगळवारच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पुलगावकडून वर्धेच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक टी-पॉइंटवर आला असताना या समोर एक कंटेनर गतिरोधक ओलांडत होता. मालवाहू ट्रक भरधाव असल्याने थेट कंटेनरला मागावून धडकला, या अपघातात एम, एच.२३ ए. यू.१७४९ या मालवाहू ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसेंदिवस हे. गतिरोधक धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here