फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान! तीन टप्प्यात होणार अनुदानाचे वितरण

वर्धा : शेतक-यांना ‘फळपिकांकडे वळविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या फळबाग लागवड योजना राबबिण्यात येतात. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही त्यातील एक महत्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतक-यांना तीन वर्षात टप्प्या टप्प्याने 100 टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेच्या लाभासाठी शेतक- यांकडून महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागविले जातात. योजनेतून आंबा कलमे, रोपे, आंबा कलमे (सधन लागवड), पेरु कलमे, पेरु कलमे (सधन लागवड), डाळींब कलमे, कागदी लिंबू कलमे, रोपे, संत्रा, मोसंबी कलमे, संत्रा कलमे (इंडो- इस्त्राईह पध्दत), सिताफळ कलमे, आवळा कलमे, चिंच कलमे, रोपे, जांभूळ कलमे, रोपे, फणस कलमे, रोपे, अंजीर कलमे, चिक्क कलमे या फळपिकाचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र शेतक-यांना कृषी विभागाच्यावतीने संमती दिली जाते. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत अदा केलेल्या परवाण्यावर कलमा, रोपाची उचल केल्यानंतर लागवड करावी लागते. शेतक-यांनी लागवड केल्यानंतर अनुदानाची रक्कम पुढील तीन वर्ष टप्प्याटप्याने अदा केली जाते. त्यात पहिल्या वर्षो कलमे विक्री व लागवडीसाठी एकुण मंजूर अनुदानाच्या 50 टक्के रक्‍कम वितरीत केली जाते. दुस-या वर्षी 30 टक्के रक्क्म व तिस-या वर्षी अनुदानाची 20 टक्के रक्‍कम शेतक-यास दिली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here