
वर्धा : मजुरीच्या पैशातून झालेल्या वादात व्यक्तीला तिघांनी बेदम मारहाण करीत जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना करंजी काजी गावात घडली असून याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. रवींद्र बावणे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
रवींद्र बावणे हा ठेकेदाराचे काम करतो. त्याने शरद कन्नाके याचे घरबांधकामाचा ठेका घेतला होता. तसेच घराचे काम सुरू असताना मजुरीच्या पैशाचा वाद झाल्याने रवीद्रने शरदच्या घराचे बांधकाम ८ दिवसांपूर्वी बंद केले होते. याचा राग मनात धरून शरद कन्नाके, नीलेश कन्नाके, अतुल सडमाके यांनी रवींद्र बावणे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यावर काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी तिघांविरुद्ध जीवे. मारण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, तिघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.