आर्वी : व्यक्तीचा मृतदेह शेतालगत आढळून आला. ही घटना आर्वी तालुक्यातील अल्लीपूर पुनर्वसन भागात 3 रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
आर्वी-नांदपूर-देऊरवाडा मार्गावरील अल्लीपूर पुनर्वसनसमोर लाडके यांच्या शेतानजीक एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही बाब एका नागरिकाच्या लक्षात येताच त्याने याची माहिती पोलिसांना दिली. आर्वी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पाहणी केली असताना ती व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक व्यक्ती ही गुराखी असून जनावरे चारण्याचे काम तो नेहमी या परिसरात करीत होता. असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.