Home ◼️ संपादकीय दिग्दर्शक सागर भोगे यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर! दिल्लीत होणार त्यांच्या कार्याचा...

दिग्दर्शक सागर भोगे यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर! दिल्लीत होणार त्यांच्या कार्याचा सन्मान

वर्धा : कला क्षेत्रातील चमकते तारे तसेच लेखक, गीतकार, दिग्दर्शक, कलाकार म्हणुन प्रसिद्ध असलेले सागर भोगे यांना केटीके आउटस्टँडिंग अचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन आणि हेलियम प्रोडक्शन या दोन्ही नामांकित संस्थाच्या अंतर्गत दिल्लीतुन भारत गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार (ता. २७) जून रोजी दिल्लीत दिला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली अाहे.

ते अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून वर आले आहेत. त्यांनी आपलं करिअर शून्यातून उभं केल प्रचंड मेहन घेतली. त्यांनी आतापर्यंत १७ मराठी लघुपट, हिंदी वेबसेरीस व मराठी वेबसेरीस तसेच हिंदी गाणे व मराठी गाणे आपल्या नावावर झळकावले आहेत.

परिस्थितीची जाणीव ठेऊन त्यांनी पर्ण, पावटी, रोल मॉडेल असे लघुचित्रपट समाज जीवनावर आधारित तसेच समाजाला चटका देणारे हे समाजापुढे आणले आहेत. आता नुकताच भारत गौरव पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या उत्तम दिग्दर्शक या कार्याला मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!