
वर्धा : तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याने नशामुक्त भारतासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने देशभर ‘रन फॉर हेल्थ’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वर्ध्यातील मॅरेथॉन रविवारी (९ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होईल, अशी माहिती बजरंग दलाचे जिल्हा संयोजक महेश राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१४ ते ४० वयोगटातील पुरुष आणि महिला गटांत मॅरेथॉन होणार असून आतापर्यंत सुमारे १५० ऑनलाईन नोंदणी झाल्या आहेत. विजेत्यांना ₹5,001, ₹3,001 आणि ₹2,001 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. “जन-जन का एक ही नारा… नशा मुक्त हो देश हमारा” या घोषणांसह ही मॅरेथॉन पार पडणार आहे.
राऊत यांनी वर्धेकर नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. पत्रपरिषदेला बजरंग दलाचे जिल्हा प्रभारी मुन्ना यादव, जिल्हा विद्यार्थी प्रमुख अंबुज पांडे, दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजक पुनम भोयर आणि नगर संयोजक अॅड. स्वाती दोडके उपस्थित होत्या.




















































