सळाखी चोरणाऱ्या ला ठोकल्या बेड्या! मुद्देमाल केला हस्तगत

वर्धा : बांधकामावरून सळाकी चोरून नेल्याची घटना बोरगाव मेघे परिसरात घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत चोरट्यांचा शोध लावून दोन चोरट्यांच्या मुसक्‍या आवळून त्यांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुन्हे शोध ‘पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. प्रशांत नामदेवराव सुरकार रा. गौरी नगर, सावंगी मेघे. यांच्या घराचे बांधकाम बोरगाव मेघे परिसरात सुरू आहे. बांधकामासाठी सळाकी त्यांनी विकत घेऊन ठेवल्या होत्या. बांधकाम पूर्ण होत आल्याने केवळ ८ एम.एम, सळाकीचे बंडल शिल्लक होते. अज्ञात चोरट्याने सळाकीचे बंडल चोरून नेले.

याची तक्रार त्यांनी शहर पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता चोरटा चंदन फुलचंद शेंड आणि राहुल कर्णल लोंढे, दोन्ही रा. अशोकनगर यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरट्यांच्या ताब्यातून ४ हजार किमतीची ८० किलो वजनाची सळाक हस्तगत केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशात पोलीस उपनिरीक्षक सुरेश दुर्गे, सचिन इंगोले, राजेंद्र ढगे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here