
वर्धा : आज 14 जून 2021…बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरापूर्वी ह्या घटनेनंतर झालेल्या अनेक दाव्यांमुळे, गंभीर आरोपांमुळे, विविध खुलाशांमुळे अख्ख बॉलीवूड हादरलं अन् राजकारणाने टोक गाठलं. गेल्या वर्षभरात या घटनेशी संबंधित अनेक घटना घडल्या अनेक तर्कवितर्क लढवले गेले आणि अनेकांनी त्यात आपल्या पोळ्या व्यवस्थित भाजून घेतल्या. पण, अजूनही मुख्य प्रश्न अनुत्तरितच राहिला. तो म्हणजे सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली?


















































