साहित्याची केली तोडफोड! इंदिरा सूत गिरणी मधील घटना

वर्धा : कामावर गैरहजर असलेल्या कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थांबविले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी जनरल व्यवस्थापक यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून संगणकाची तोडफोड केली. ही इंदिरा सहकारी सूत गिरणी मर्या. वर्धा येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, इंदिरा सहकारी सूत गिरणी मर्या. वर्धा येथे हर्षल हंसराम कांबळे रा. बरबडी हा कंत्राटीपद्धतीने रिंगफ्रेम विभागात काम करीत होता. गत दोन-तीन महिन्यांपासून कामावर गैरहजर होता. ऑगस्ट 2021 मध्ये तो 6 दिवस हजर होता. तसेच ऑक्टोबरमध्ये 8 दिवस कामावर हजर होता. करिता दोन महिन्यांचे वेतन तो कामावर रुजू होतपर्यंत थांबविले होते. त्याला वारंवारा फोनव कामावर येण्याबाबत सुचना दिल्या. परंतु, तो कामावर रजू झाला नाही.

18 नोव्हेंबर रोजी रोजी दुपारी 1.45 वाजताच्या दरम्यान गिरणीचे जनरल व्यवस्थापक सुशील कुमार सारडा यांची भेट घेतली व माझे वेतन थांबविण्यात आले, याबाबत विचारणा केली असता त्यांनी आदी कामावर नियमानुसार रुजू व्हावे नंतर तुमचे वेतन अदा करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने अश्लील भाषेत शिवीगाळ करून संगणकाची तोडफोड केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी अंकुश पोहाणे यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here