अंधश्रद्धेला स्वतःच्या जीवनात थारा न देता विद्यार्थ्यांनी चिकीत्सक बनावे! निलेश गुल्हाने

हिंगणघाट : भूत, भानामती, करणी, जादूटोणा यासारखे कोणतेही प्रकार अस्तित्वात नसल्याचे विज्ञानाने आज सिद्ध केले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला स्वतःच्या जीवनात थारा न देता स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण करून चिकीत्सक बनावे, असे प्रतिपादन अ.भा.अंनिसचे जिल्हा सचिव निलेश गुल्हाने यांनी केले.

तालुक्यातील शेगाव (कुंड) येथील सरस्वती विद्यालय येथे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात अ.भा.अंनिस ची भूमिका आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोल्हे उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. गुल्हाने यांनी अ.भा.अंनिस ची भूमिका विशद करीत अंनिस कार्याचा तपशील सांगितला. याप्रसंगी त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्यातील कलमांची माहीती देत दक्षता अधिकारी यांचे कर्तव्य आणि अधिकार, कायदा कोणाला लागू होतो कोणाला लागू होत नाही, शिक्षेचे स्वरूप, अनुसूचीतील बारा बाबींची माहीती आदींबाबत उदाहरणासह सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. कोल्हे यांनी दैनंदिन जीवनातील अंधश्रद्धा संदर्भातील बाबी सांगून त्यापासून आपण दूर रहायला हवे, असे प्रतिपादन केले.

यावेळी जेष्ठ शिक्षक चंद्रशेखर निमट यांनी प्रास्तविक केले. संचालन विद्यार्थी प्रतिंनिधी प्राजक्ता तेलरांधे यांनी करून आभार अरविंद कोपरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here