बस समोर कार आडवी लावून चालकास बदडले! कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

समुद्रपूर : कारचालकाने बसच्या समोर कार आडवी लावून एसटी बसचालकास मारहाण केल्याची घटना खंडाळा ते हळदगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजेश महादेव हुरर्ले रा. हिंगणघाट हे परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवासी घेऊन जात हिंगणघाटकडे जात असताना एम, एच. ४९ एन. ०११० क्रमांकाच्या कारचालकाने भरधाव कार चालवून बसच्या समोर येत कार आडवी लावून बस थांबविली. चालक राजेश याने कारचालकाला हटकले असता तुझी बस कानकाटी जवळ उभी असताना माझ्या कारचा अपघात झाला, असे म्हणून राजेशला मारहाण केली. राजेच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती असून पुढील तपास समुद्रपूर येथील पोलीस निरीक्षक करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here