

वर्धा : पोलिसांसमोर माझ्या विरोधात साक्ष का दिली, असे म्हणत युवकाला लाथाबुक्क्यांनी मारून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गिट्टी खदान परिसरातील हनुमान मंदिराच्या जवळ घडली. शुभम लटारी चांदेकर, रा. बोरगाव हा त्याच्या मित्रासह गप्पा करत असताना अक्षय दिगांबर सातपुते हा तेथे आला. त्याने माझ्या विरुद्ध पोलिसात साक्ष का दिली, असे म्हणत शुभमला लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारून जिवे मारण्याची धप़की दिली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या किरकोळ कारणातून वादाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. असे वाद गावातच मिटले पाहिजे, यासाठी तंटामुक्त समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, ही समिती आता केवळ नावापुरताच राहिली असून, याला बुस्टर देण्याची नितांत गरज आहे.

























































