

वर्धा : जिल्ह्यात उष्णतेची लाट जोरात आहे. सलग चवथ्या दिवशी तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून् हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांपर्यंत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे संकेत आहे. यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास सामसुम होते. तसेच नागरिक घराबाहेर निघणे टाळत आहेत.
नागरिकांनो सावधान रहा…
दुपारी १२ ते ४ या दरायान शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळा, भरपूर पाणी प्यावे, ओले कपडे वापरा आणि हलके रंगाचे कपडे घाला. वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असून यापुढे देखील अशी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहणे गरजेचे आहे.



























































