Home ◼️ संपादकीय स्वयंपाकघरातही भेसळीचे ‘स्लो पॉयझन ! ९00 लिटर भेसळयुक्त तेल जप्त ; नामांकित...

स्वयंपाकघरातही भेसळीचे ‘स्लो पॉयझन ! ९00 लिटर भेसळयुक्त तेल जप्त ; नामांकित कंपन्यांच्या नावाखाली ग्राहकांची लूट॒

वर्धा : सध्या बाजारात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या शुद्धतेवर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, आता वर्धा जिल्ह्यात खाद्यतेलही सुरक्षित राहिले नसल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या वर्षी जिल्ह्यात केलेली कारवाई या चिंतेत भर घालणारी आहे. एफडीएने गतवर्षी जिल्ह्यात तब्बल ९०० लिटर भेसळयुक्त तेल जप्त केले होते. या कारवाईमुळे खाद्यतेल विक्रेते आणि रिपॅकर्सचे धाबे दणाणले असले, तरी सामान्य ग्राहक मात्र अजूनही संभ्रमावस्थेत आहे.

वर्ध्यात स्थानिक पातळीवरच तेल. तयार होते असे नाही, तर जिल्ह्याबाहेरूनहो मोठ्या प्रमाणावर तेलाची आवक होत आहे. यामध्ये प्रामुख्याने नेर परसोपंत आणि बोरी अरब या भागांतून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल वर्घ्यात आणले जात आहे. या बाहेरील तेलाच्या शुद्धतेबाबत कोणतीही खात्री नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे. वर्धा शहरासह जिल्ह्यात खाद्यतेलाचे (पिपा) डब्यांचे सुमारे १० मोठे स्टॉकिस्ट आहेत. यांच्या माध्यमातून किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत तेल. पोहोचते. एवढेच नाही तर ग्राहकांचा विश्‍वास असलेल्या शहरातील विविध मॉल्स आणि मार्ट्समध्यहो वेगवेगळ्या कंपन्यांचे आकर्षक पॅकिंग असलेले तेल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

मात्र, चकचकीत मॉल्समध्ये मिळणारे हे तेल खरोखरच शुद्ध आहे का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. शुद्धतेच्या मोठ्या जाहिराती आणि आकर्षक पॅकिंगला भुलून ग्राहक महागडे तेल खरेदी करत आहित. मात्र, सतत समोर येणाऱ्या भेसळीच्या प्रकारांमुळे नेमके कोणते तेल खरेदी करावे, याबाबत ग्राहक प्रचंड संभ्रमावस्थेत आहेत. पैशांची उधळपट्टो करूनही आरेग्याला घातक ठरणारे तेल माथी मारले जात असल्याने नागरिकांमध्ये तोत्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता, जिल्ह्यातील सर्व रिपॅकर्स, मॉल्स आणि स्टॉकिस्टच्या गोदामांव धडक तपासणी मोहीम राबवावी आणि दोषोंवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशो प्रागणी आता जोर घरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!