एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना परिषदेची उमेदवारी निश्चित

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :

माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्यापैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजपकडून ४ उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी पक्की झाली आहे.


एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती.खडसे यांच्या ऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणुकीत तीचा पराभव झाला. तर बावनकुळे यांचा पत्ता अनपेक्षितपणे कट करण्यात आला होता. मुलीच्या पराभवाचे खापर एकनाथ खडसे यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर फोडत आपली नाराजी व्यक्त केली होती.तसेच त्यांनी विधान परिषदेसाठी आपली दावेदारी जाहीर केली होती. तर बावनकुळे यांच्यावर उमेदवारी नाकारून अन्याय झाल्याची भावना भाजपमध्ये असल्याने अखेर त्यांना संधी देण्याचे निश्चित झाले.
पंकजा मुंडे यांचा परळी मधून त्यांचे बंधू सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पराभव केल्याने त्या राजकारणात बाजूला पडल्या आहेत. त्यांना पुन्हा एकदा ताकद देण्यासाठी भाजपने विधानपरिषद पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here