धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वर्धा : मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी किशोर तराळे नामक व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुस्लिम समाज बांधवांनी तहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदन सादर करून धार्मिक भावना भडकवणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या प्रकरणी अब्दुल समीर अब्दुल कयूम यांनी तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत. तर शुक्रवारी दुपारी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत वर्धा शहर पोलीस स्टेशन गाठले. मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्याकडे निवेदन देऊन केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here