पवनार येथे श्री भागवत सेवा समितीच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली

पवनार : श्री भागवत सेवा समितीच्या वतीने पवनार येथे बाजार चौकात भारतरत्न गानकोकिळा स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी शोकसभा घेण्यात आली.

यावेळी भागवत सेवा समितीचे अध्यक्ष नारायण गोमासे यांनी लता मंगेशकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व शोक सभेत दोन मिनिटांचे मौन पाळून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देण्यात आली.

यावेळी यावेळी भागवत सेवा समितीचे अध्यक्ष नारायण गोमासे, शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष श्रीकांत तोटे, नितीन कवाडे, मुनेश्वर ठाकरे जयंत गोमासे, विनोद पेटकर, राजू बावणे, विशाल पेटकर यांच्यासह आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here