मोबाईल शॉप फोडली! मोबाईलसह रोख लंपास; पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास मोबाईल शॉपी फोडून दुकानातील तीन मोबाईल तसेच ४ हजार रुपये रोख रक्‍कम लंपास केली. आर्वी रस्त्यावरील बजाज महाविद्यालय परिसरात ही घटना घडली.

विपीन सुरेश कापसे यांचे विपीन मोबाईल शॉपी नामक दुकान आहे. तो रात्री दुकान बंद करुन घरी गेला. दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यास आला असता त्याला दुकानाचे कुलूप तुटून शटर वाकवलेले दिसून आले. दुकानाची पाहणी केली असता तीन मोबाईल आणि ४ हजार रुपये रोख असा एकूण ६७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरुन नेलेला दिसून आला. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here