सायकल रॅलीतून पेट्रोल- डिझेल दरवाढीचा निषेध! केंद्र सरकारवर मोर्चातून ओढले ताशेरे

आर्वी : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आर्वी, देवळी विधानसभा क्षेत्रात युवा सेनेकडून सायकल रेली काढून दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. रॅलीत सर्वसामान्य नागरिक, युवासैनिक, पदाधिकारी व, माजी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत केंद्र सरकारवर ताशेरे ओढून घोषणाबाजी केली.

युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये वर्धा जिल्ह्यातर्फे आर्वी-देवळी विधानसभा क्षेत्रात युवासेनेचे जिल्हाप्रमुख सूर्या हिरेखन यांच्या नेतृत्वात प्रवीण झटाले, महेश चौधरी, विपुल चौधरी, किरण मलमकर, अमोल चरडे, प्रवीण पलसूलकर, जावेद खान यांच्या उपस्थितीत शहरातून डिझेल व पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली काढण्यात आली.

याप्रसंगी आशिष पांडे, अँड. विद्याधर माथने, अँड. अब्दुल सलीम, ललित इमले, प्रतीक चव्हाण, आशिष कुपले, सचिन पारधी, संकेत कुत्तरमारे, आशिष नाकतोडे, राजू केझरकर, चंदू राऊत, पवन नावाड़े, नारायण काळपांडे, महादेव विरेकर, छोटू पारधी, राजेश बारापात्रे, पिंट्र सोनटके, दानिश, नितीन गावंडे, सुचीत चंबुलवार, नदीम भाई, रोशन भेंडारकर, ललीत हरदिया, सतीश नायर, रवि मेंडे, संदीप ओंकार, मिठाईलाल जुप्ता, नितेश खंडागळे, नरेश वामन क्षीरसागर, तुषार शिंदे, चेतन डोईफोडे, गोलू राऊत, तेजस मेश्राम, गौरव चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी आर्वी, पुलगाव शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी निषेध करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here