व्याजाच्या दोन हजार रुपयासाठी कारने चिरडून खून! नागसेन नगरातील घटना

वर्धा : व्‍याजाचे दोन हजार रुपये न दिल्याच्या कारणावरुन कारने चिरडून खून केल्याची घटना गुरूवारी (ता.२) रात्री ९ वाजताच्या सूमारास शहरातील नागसेन नगर येथे घडली. शंभू देवराव सोनगडे ( वय ४५ ) रा. नागसेन नगर असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी मारेकरी शैलेश येळणे यांला ताब्‍यात घेतले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार शंभू सोनगडे यांची पत्‍नी जयमाला सोनगडे यांनी पाच हजार रुपये मध्यस्‍थी महिलेच्या मदतीने शैलेश येळणे यांच्याकडून व्‍याजाने घेतले होते. पाच हजारातील तीन हजार रुपये जयमाला यांनी व्‍याजासह परत केले. दरम्‍यान उर्वरित दोन हजार रुपयाची रक्‍कम घेण्यासाठी शैलेश मध्यस्‍थी महिलेसह स्‍विप्‍ट डिसायर कार मधून जयमाला सोनगडे यांच्या घरी आला. उरर्वरित पैशाच्या मागणीवरुन वाद झाला.

त्‍यात शैलेश येळणे यांनी जयमाला सोनगडे या महिलेला मारहाण करीत असल्याने पत्‍नीला वाचवण्यासाठी शंभू सोनगडे मध्ये गेला. दरम्‍यान शैलेश आणि शंभू यांच्यात झटापटी झाली. शेजारच्यांनी समजुत घालत शंभू याला शांत केले तर शैलेश आणि मध्यस्‍थी महिला घरुन निघाले. घराबाहेर उभ्या असलेल्‍या स्‍विप्‍ट कार मध्ये दोघेही बसले. झालेल्‍या घटनेबद्दल खंत व्‍यक्‍त करत जयमाला, व शंभू शैलेश याच्या कार जवळ आले. दरम्‍यान डोक्‍यात राग घालून असलेल्‍या शैलेशने कार सुरू करत दाेघांनाही मारण्याच्या हेतूने अंगावर चढवली. दरम्यान शंभू सोनगडे यांने पत्‍नीला ढकलेले त्‍यामुुळे त्‍या वाचल्या तर शंभू सोनगडे याला ५्० मिटर पर्यंत घासत नेत घटना स्‍थळावरुन शैलेशने पळ काढला.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या शंभू सोनगडे याला नागरिकांनी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्‍याच्यावर प्रथमोपचार करत सेवाग्राम रुग्‍णालयात रेफर करण्यात आले. तथे त्‍याचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here