महिलेचे मंगळसूत्र लंपास! आर्वी बसस्थानकावरील घटना

वर्धा : महिलेच्या बॅगेत असलेले मंगळसूत्र (किंमत १५ हजार) व रोख २४० रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवार १ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान आर्वी बसस्थानकातील हनुमानमंदिर परिसरात घडली.

लिलाबाई रामदास महाजन (७०) रा. मोरांगणा या नातेबाईकाचे लग्न असल्याने २८ नोव्हेंबरला देऊरवाडा येथे आल्या होत्या. दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोरांगणा येथून आर्वी येथे लग्नासाठी गेल्या. त्यानंतर १ डिसेंबरला लग्नआटोपून मोरांगणा येथे परत जाण्याकरिता आर्वी बसस्थानकावर बसची वाट पाहात असता त्यांच्या जवळ असलेल्या बॅगमधील ५ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र (किमंत १५ हजार) व तिकिटाचे २४० रुपये असा १५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध आवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here