लाखोंचा गुटखा, तंबाखू जप्त! सीआयटीचे 3 ठिकाणी छापे

वर्धा : गुप्त माहितीच्या आधारे पोलिस कार्यालयाच्या गुन्हे गुप्तचर पथकाने सोमवारी 20 मार्च रोजी सायंकाळी शहरातील तीन आस्थापनांवर छापे टाकले. त्यात विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू व गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त केल्याने खळबळ उडाली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महता माकेट व बडे हे चौक स्थित प्रिया सुगंधित सुपारीचा माल या साठवून ठेवण्यात आला होता. तेथून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आल्याची गोपनीय माहिती क्राइम इंटेलिजन्स टीमला मिळाली. माहितीच्या आधारे मोहता मार्केट स्थित दुकानात छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाण माल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई मोहता मार्केट परिसरच्या मागील भागात एका प्रतिष्ठान करण्यात आली. तर तिसरी कारवाई बढे चौकातील प्रिया ट्रेडिंग कंपनी हार्डवेअर अँण्ड इलेक्टि्रल्स येथे करण्यात आली. गोदामातून विविध 19 कंपन्यांचा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला. तिन्ही ठिकाणाहून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे 20 लाख असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, क्राईम इंटेलिजन्स टीमचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप कापडे, कर्मचारी व शहर ठाण्याचे कर्मचारी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here