

वर्धा : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करावी त्रयस्थ व्यक्ती मार्फत अर्ज करु नये असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.
बांधकाम कामगांराना आता नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटप इत्यादीसाठी अर्ज करतांना नाव, पुर्ण पत्ता, जन्मतारीख, कुटूंबातील व्यक्तीची नावे इत्यादी माहिती तपासून www.mahabocw.in या संकेतस्थळावर दाखल करावी लागणार आहे. ज्यांचे अर्ज मंजुर झाले आहे त्यांना संदेश प्राप्त होईल व त्यासोबत नोंदणी शुल्क रु.25 व मासिक शुल्क रु.12 भरण्याची लिंक पाठविण्यात येईल. पैसे भरल्यानंतर सदर लिंकवरून ऑनलाईन पावती काढून घ्यावी. सदर पावती एमएच 30 क्रमांकापासुन सुरु होणारा बारा अंकी क्रमांक असेल. सदर क्रमांकाचा उपयोग करुन बांधकाम कामगारास पात्र असलेल्या सर्व योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. कोविड महामारीचा प्रादुर्भाव असल्याने कार्यालयामधुन स्मार्ट कार्ड, नोंदणी व नुतणीकरण पावती वाटप बंद करण्यात आलेले आहे. असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.