मॉर्निग वॉक’ भोवले! शिक्षकास बदडले; पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघालेल्या शिक्षकावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी हल्ला करीत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना मारोतीभाऊ समाधी ते हरिहरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर घडली.

किशोर दामोधर पिंपरे, रा. म्हाडा कॉलनी हे रमाबाई विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते पहाटेच्या सुमारास पायदळ फिरण्यासाठी गेले असता हरिहर-नगरकडे जाणाऱ्या मार्गावर मागाहून दोन दुचाकीवर चार युवक आले. तसेच सकाळी कशाला फिरतो बे, असे म्हणत जोरात हॉर्न वाजवून निघून गेले. काही वेळाने पुन्हा त्या चारही युवकांनी किशोरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका युवकाने विटेने डोक्यावर मारहाण केली.या घटनेची तक्रार त्यांनी रामनगर पोलिसांत दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here