दुचाकी-व्हॅनची धडक! व्हॅन उलटली; वाहनाचा चुराडा: तिघे गंभीर

गिरड : व्हॅन आणि दुचाकीत समोरासमोर धडक झाली. अपघात होताच अनियंत्रित झालेली व्हॅन उलटली. सोमवारी दुपारी हा अपघात नजीकच्या सक्करबाहुली शिवारात झाला असून, यात तिघे व्यक्‍ती गंभीर जखमी झाले, तर व्हॅनचा चुराडा झाला आहे.

एम.एच. 3१ डी.सी. ६१९८ क्रमांकाची कार आणि एम.एच. ४० एच.एन. २१११ क्रमांकाची दुचाकीयांच्या जबर धडक झाली. यात दुचाकी चालक राजेश जवंजाळ (४७) व दिनेश दादाजी जोगवे (४७) (दोन्ही रा. उमरेड) तसेच दुचाकीस्वार सूचित नामदेव माथनकर (२७,रा. हिवरा (हिवरी) हे गंभीर जखमी झाले.

अपघात होताच अनियंत्रित झालेली व्हॅन उलटली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण तिघांचीही प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास जमादार पंचम कोडगीलवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here