

वर्धा : महिलेचा विनयभंग करुन अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणात वाहितपूर येथील माजी सरपंचाचे पती आरोपी सुभाष डायाव्हाणे याला ७ वर्ष 3 महिने कारावासाची शिक्षा तसेच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा वर्धा न्यायालयाने ठोठावली आहे.
वाहितपूर येथील सुभाष डायगव्हाणे याने त्याच्याच ओळखीतील एका महिलेचा विनयभंग करुन तिला जीवे मारण्याची धमकी दित विनयभंग केला होता. पीडितेने याबाबतची तक्रार सेलू पोलिसात दिली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी व पीडितेची बाजू ऐकली तसेच साक्षीदार तपासून आरोपी सुभाष डायगव्हाणे याला ७ वर्षाची शिक्षा व २५ हजारांचा दंड ठोठावला.
मात्र, आरोपी सुभाष याने वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली. वरिष्ठ न्यायालयाने पुन्हा या प्रकरणाचा तपास करुन खालच्या न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत आरोपी सुभाष डायगव्हाणे याची शिक्षा कायम ठेवून २५ हजार दंडापैकी २० हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेश दिला. तसेच उर्वरित पाच हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश पारित केला.