पवनार शिवारत वाघाने पुन्हा केली एका कालवडची शिकार ; परिसरात दहशत कायम

पवनार : शिवारात वाघाची दहशत कायम असून काल गुरुवार (ता. १०) रात्रीच्या सुमारास शेतकरी गोविंद पाटील यांच्या शेतशेतातील गोठ्यात बांधून असलेल्या वासराची वाघाने शिकार केल्याची घटना घडली. पाच दिवसांपूर्वी दिलीप घुगारे यांच्या शेतातील बाधून असलेल्या गायीची वाघाने शिकार केली होती. त्यामुळे परिसरात वाघाची दहशत पसरलेली आहे.

परिसरातील पंजाच्या ठश्यावरून सदर प्राणी हा वाघ असल्याचे दिसून आले. वन विभागाच्या वतीने गावात दवंडी देऊन परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले. मात्र गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोविंद पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेली कालवड खाल्ल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी परिसराची पाहणी केली असता तोच वाघ परिसरात फिरत असल्याचे सांगण्यात आले.

वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी शेतातील जनावरे घरी आणून बांधली असून परिसरात कुणीही शेतमजूर कामाला जायला तयार नाहीत. सध्या गहू, हरबरा सौंगणीचे दिवस असून तो तसाच शेतात पडून नुकसान होत आहे. वन विभाग आणि पिपल फॉर अँनिमल यांच्याकडून सर्व प्रयत्न चालू आहे मात्र अद्याप वाघ परिसरात मोकाट फिरत असल्याने शेतकर्यांमध्ये दहशत कायम आहे.

वाघाचा लवकरात लवकर बदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी दिलीप घुगरे, गोविंद पाटील, राजू देवतळे, बाळू सातपुते, कुंदन वाघमारे, नितीन कवाडे, नीलकंठ सातपुते, धनराज, रवींद्र उमाटे, नारायण देशमुख, लीलाधर भुजाडे वं परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

……………………

परिसरात आढळलेल्या पायाच्या ठष्यांवरुन तो वाघ असल्याचा अंदाज आहे मात्र जोपर्यंत त्याची ओळख पटनार नाही तोपर्यंत तो वाघच आहे की अन्य कोणता प्राणी हे खात्रीशीर सांगता येणार नाही. मात्र वनविभाग आणि पिपल फॉर अँनिमलची टिम याचा शोध घेत आहे परिसरात सर्वत्र कँमेरे लावलेले आहे लवकरच त्याची ओळख पटेल आणि यावर उपाय योजना होईल.

कौस्तूभ गावंडे, पिपल फॉर अँनिमल, प्राणी विभाग प्रमुख वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here