

वर्धा : स्थानिक परसोडी मार्गावरील रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या एका विवाहितेचा रेल्वेतील कर्मचाऱ्याने विनयभंग केला . ही घटना मंगळवारी घडली असून स्थानिक पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . प्रफुल भीमराव भगत ( ३३ ) हा रेल्वे विभागात काम करतो. येथील रेल्वे वसाहतीतील पीडितेच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने तिच्या घरात प्रवेश केला. आरोपी इतक्यावर थांबला नाही तर त्याने पीडितेला लज्जा येईल असे वर्तवणूक करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी सिंदी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.