क्रेनखाली दबल्याने युवकाचा मृत्यू! दोन जखमी; हेलोडी-तुळजापूर शिवारातील घटना

सेलू : रेल्वे थर्ड फोर लाईनच्या कामावर असलेल्या क्रेन मशीनचा पट्टा तुटून पडल्याने 19 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. ही घटना सोमवार 15 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान, मौजा हेलोडी तुळजापूर शिवारात घडली. सागर आनंद जगताप (वय 19) रा. धपकी बेडा असे मृतकाचे नाव आहे. तर चेतन सावरकर व शंकर वाळके दोघेही रा. कोटंबा असे जखमींची नावे आहेत.

तालुकयातील हेलोडी, तुळजापूर, सिंदी या भागात नवीन रेल्वेलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता लागणारे साहित्य तयार करण्यासाठी मौजा हेलोडी तुळजापूर शिवारात जनार्दन लोहिया यांच्या शेतात प्लांट उभारण्यात आला असून, तेथे कामगार म्हणून हे तरुण मुलं कामावर होते. घटनास्थळी 9 लोक काम करीत होते. त्यात तीन कामगार, एक क्रेन ऑपरेटर व इतर इंजिनिअर होते. दरम्यान, जीर्ण झालेला क्रेन मशीनचा पट्टा तुटल्याने मशीनचा वजनदार भाग पडून सागर जगताप याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करीत असलेले दोनजण जखमी झाले. घटना घडताच कामावर असलेले इंजिनिअर व ऑपरेटर हे घटनास्थळावरून पळून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here