

वर्धा : हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील आजंती शिवारात पांढरकवडा वरून मजुर घेऊन नागपूरकडे धरधाव वेगाने निघालेले ट्रॅव्हल्स क्रमांक एम ए २९ एम ८४५४ चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढून पलटी झाली. या भिषण अपघातात ट्रॅव्हल्स मधिल दोन प्रवासी ठार झाले तर अन्य जखमी झाल्याची घटना घडली.
या अपघाची माहिती हिंगणघाट पोलिस ठाण्याचे ठाणेदार संपत चव्हान, उपनिरीक्षक दिपेश ठाकरे, रवि वानखेडे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या भिषण अपघाताची माहिती मिळताच आमदार समिरभाऊ कुणावार यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमी योग्य उपचारासाठी पाठविण्याच्या सुचना दिल्या या अपघाताचेवेळी या ट्रॅव्हल्स मधून २० ते २२ मजूर पांढरकवडवरून दिवाळी मध्यप्रदेश येते आपल्या गावाकडे पजात असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही मुत्यकांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताची नोंद हिंगणघाट पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.