माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचे कडून कळंबचे कडाळे व डाळजच्या मेटे कुटुंबाचे सांत्वन

 

निरा नरसिंहपुर दिनांक 13 :प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

कळंब (बोरकरवाडी)मध्ये कडाळे कुटुंबातील दोन सख्या भावांचा हृदयविकाराने मृत्यू झाला तसेच डाळज नं. 1 येथील हनुमंत मेटे यांचे चिरंजीव प्रतिक मेटे वय 22 वर्ष यांचे काल अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही कुटुंबाची सोमवारी(दि.13) भेट घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांत्वन केले.

कळंब गावातील यशराज नवनाथ कडाळे वय वर्ष 15 व यशवंत नवनाथ कडाळे वय वर्ष 13 या दोन्ही सख्या भावांचा हृदयविकाराने निधन झाले होते. कडाळे कुटुंबीयांची भेट घेत, धीर देत हर्षवर्धन पाटील यांनी सांत्वन केले. या मयत मुलांचे वडील केनियामध्ये परदेशी असल्यामुळे आणि जागतिक कोरोना संकटामुळे त्यांना मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी मायदेशी परतता आले नाही. त्यांना मायदेशी आणण्यासाठी आपण सर्व तो प्रयत्न करू,अशी भावना यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नातेवाईकांशी बोलून दाखवली.

डाळज नं. 1 येथील हनुमंत मेटे यांचे चिरंजीव प्रतिक मेटे वय 22 वर्ष यांचे अपघाती मृत्यू झाला. प्रतीक हा मनमिळावू शांत स्वभावाचा होता.

कडाळे व मेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन,  मानसिक आधार देत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांत्वन केले.

—————————————————–

-फोटो.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here