
तुळजापूर(वघाळा) : मागील काही वर्षापासून कपासी सह सोयाबीन पिकही शेतकऱ्यांना दगा देत असून शेतकऱ्यांना सर्वच बाबतीत मोठा फटका बसत असून दूरगामी वाईट परिणाम दिसून येत आहे.
तुळजापूर येथील शेतकरी हेमंत जिकार यांचे अडीच एकर शेतातील सोयाबीन अपुऱ्या पावसामुळे करपले. सोयाबीन पिकावर चार दिवसा पुर्वी तणनाशकाची फवारणी केली होती. नंतर पाऊस गायब झाला. अशात सोयाबीन जळले जिकार यांचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान होऊन परत आज सोयाबीची पेरणी करावी लागली.
परंपरागत या मुख्य पिकावरच शेतकऱ्यांची मदार असते. उपजीविकेचे साधन शेतीच असल्याने शेतकरी कर्ज काढून शेती करीत आहे. पण निसर्ग साथ देतांना दिसत नाही हे वास्तव नाकारता येत नाही.


















































