मोहता मिलची गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करा! किसान संघटनेची मागणी; तहसीलदारांमार्फत उद्योगमंत्र्यांना निवेदन

हिंगणघाट : आरएसआर मोहता मिलमधील कथित आर्थिक गैव्यवहार प्रकरणात ईडी, आयकर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने उद्योगमंत्र्यांना निवेदनातून करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून कामगारांचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. मिल प्रशासन मात्र सुस्त असून जाणीवपूर्वक कामगारांचा प्रश्‍न दाबण्याचा प्रकार करीत आहे. वेळोवेळी कंपनीला सरकारने भरघोस आर्थिक मदत केली व शेकडो एकर जमीन मोहता मिलकडे आहे तरी हा उद्योग नुकसानीत कसा, असा प्रश्‍न उपस्थित होतो. कामगारांचे 3 महिन्यांचे वेतन तसेच बोनस अद्याप मिल व्यवस्थापनाकडून करण्यात आलेले नाही.

कामगार उपोषणावर बसलेले आहे; मात्र याबाबत प्रशासनाने देखील साधी दखल सुद्धा घेतलेली नाही. कोणतीही कारवाई किंवा चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देताना आकाश बोरीकर, श्याम ईडपवार, नगरसेवक प्रकाश राऊत, सचिन थारकर, दिनेश नगराळे, रवींद्र गोडसेलवार, रंजितसिंग ठाकूर, दिगांबर पाटील, दुर्गादास मानकर, महेश वकील, नाना हेडाऊ, भास्कर वाहाण, प्रशांत ढोके संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here