ट्रक आणि टँकरचा भिषण अपघात! दोन गंभीर जखमी; मामा भांजा दर्ग्याजवळची घटना

पवनार : उभ्या ट्रकला मागून भरधाव वेगात येणार्या टँकरने जबर धडक दिली या धडकेत ट्रकची कँबीन चेंदामेंदा झाली. ही घटना सोमवार (ता. १४) महामार्गालगत असलेल्या मामा भांचा दर्ग्याजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास घडली यात टँकर चालक राजेशं पाटील वय ४५ वर्षे, अशोक बुराडे वय ३५ वर्ष दोघेही रा. भंडारा असे गंभीर जखमीच नाव आहे. जखमीवर सावंगी रुग्णालयात उपचार चालू आहे.

ट्रक क्रमांक एमएच ४० सीडी ४४१५ हा नागपुरकडे जात होता दरम्यान मामा भांजा दर्गाजवळ ट्रकचा टायर पंचर झाल्याने ट्रक रस्त्यावर उभा होता मागाहुन पेट्रोल, डिझल भरलेला टँकर क्रमाक एमएच ४९ – ९९९१ नागपुरकडे जात होता रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला रात्रीच्या सुमारास मागुन येणाऱ्या टँकर चालकाला दिसुन आलाआल नाही आणि टँकरची जबर धडक ट्रकला दिली.

टँकरची धडक इतकी भिषण होती की टँकरची कँबीन पुर्णपने चकणाचूर झाली. यात चालक आणि वाहक दोघेही फसल्या गेले होते. रस्त्याने जाणार्या वाहनचालकांनी आणि गावातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करीत घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार निलेश ब्राम्हने यांच्या मार्गदर्शनात ऐएसआय प्रकाश लसूनते, संजय लोहकरे, निलेश नेहारे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here