जिपच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांना लॅपटॉप आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान वाटप.

 

सिद्धेश्वर वामनराव कुलकर्णी
कार्यकारी संपादक लातूर
मो. 7666462744
दखल न्युज /दखल न्युज भारत

लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत 10 दिव्यांगांना लॅपटॉप आणि आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 62 आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयाचा धनादेश माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, खा.सुधाकर शृंगारे,यांच्या हस्ते सोमवारी वाटप करण्यात आले यावेळी जिपच्या उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस एल खमीदकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here