चोखोबा वार्डात होतेय गोटमार! अंधश्रद्धाळु नागरिकांकडून वेगळच कयास; परिसरात दहशत

प्रभाकर कोळसे

हिंगणघाट : शहरातील चोखोबा वार्ड येथील काळा गोटा परिसरात काल रात्रीपासून अचानक दगडफेकिचा प्रकार सुरु झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या प्रकरणी परिसरातील नागरीकांनी अज्ञात व्यकिकडून होणाऱ्या दगडफेकीबद्दल पोलिसांना सुचना दिल्यानंतर पोलिसांची चमु घटनास्थळी पोचली परिसरात शोध घेतला मात्र कुणीही सापडलेपडल नाही.

अज्ञात स्थळावरुन तसेच अज्ञात व्यक्तितर्फे ही गोटमार होत असल्याचे संशयावरुन पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत घरोघरी पाहणी केली. परंतु पोलिसांच्या तपासादरम्यान कुणीही व्यक्ति गोटमार करीत असल्याचे पुरावे आढळले नाही. महत्वाचे म्हणजे काल रात्री ८ वाजताचे सुमारास सुरु झालेल्या दगडफेकिने अनेक नागरिक, युवक तसेच महिलासुद्धा जखमी झाल्या आहेत, काल पोलिसांनासुद्धा या दगडफेकिचा सामना करावा लागला असे प्रत्यक्ष दर्शीन्नी सांगितले.

सदर परिसरात गरीब, अशिक्षित, कामगार रहिवासी असून त्यांचीसुद्धा हा कुणी अतृप्त आत्म्याचाच प्रताप असल्याचा विश्वास आहे. या काळा गोटा परिसरात ब्रिटिशकालीन गोऱ्या साहेबांच्या समाधी असून याच आत्म्याच्या तर प्रताप नाही ना?असा अंधश्रद्धाळु नागरिकांचा कयास आहे. या परिसरातील समाजसेवक युवकाने येथे असलेल्या समाधी परिसराची स्वछता करण्यात यावी यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते, परंतु अलिकडेच काही महिन्यापुर्वी या विवाहित युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. आता या परिसराची स्वछता करावी यासाठीच तो प्रेतात्मा असा प्रकार करीत आहे, अशीही अंधश्रद्धेतुन चर्चा आहे.

प्रकार काहीही असला तरी पोलिस येऊनसुद्धा हा गोटमार करणारा आरोपी न सापडल्याने हा प्रकार अज्ञात शक्तिच करीत असल्याचे भावनेतुन परिसरात दहशत पसरली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याची दखल घेऊन या मागचे कारण शोधावे, असे आवाहन परिसरातील सुज्ञ नागरीक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here