विद्युत प्रवाहाच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

चिकणी : अडेगाव येथील रविंद्र ज्ञानेक्ष्वर फुलझले (४६) याचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. रविंद्र हा सोमवारी सायंकाळी बाहेरगावावरून गावी परतला. नजीकच्या चिखली गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती त्याला मिळताच तो चिखली येथे पोहोचला.

विद्युत रोहित्रावर चढून काम करीत असताना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने तो जमिनीवर फेकल्या गेला. ही बाब लक्षात येताच त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने देवळी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here