
वर्धा : बुटीबोरी ते तुळजापूर समृद्धी महामार्गालगतच डोंगर पोखरला जात आहे. केळझर येथील टेकडीचे उत्खनन केले जात आहे. खासदारांनी याबाबत आता थेट महसूलच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. केळझर परिसरात महामार्गालगत अवघ्या ७० मीटर अंतरावर टेकडी उत्खननास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. परिसरातील गावांमध्ये पर्यावरणीय व आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, असा दावा खासदार अमर काळे यांनी तक्रारीतून केला आहे. स्थानिक नागरिकांनी खासदारांकडे याबाबत तक्रारी केल्या. त्यात टेकडी उत्खननामुळे धुळीचे प्रमाण वाढून श्वसनाचे आजार वाढण्याची भ्रीती व्यक्त करण्यात आली. पाणी स्रोतांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खासदार काळे यांनी थेट महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी तक्रारीत प्रशासनाने दिलेल्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महामार्गापासून अवघ्या ७० मीटरवर टेकडीचे उखनन होत असल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. त्याचा विपरित परिणाम वातावरणावर होण्याची शक्यता आहे. टेकडीचे उत्खनन करताना एखादवेळी अपघात घटू शकतो.
५०० मीटरच्या आत उत्खननास बंदी परवानगी
२०१३ च्या गौण खनिज नियमांनुसार राष्ट्रीय महाप्रार्गांपासून ७०० मीटरच्या आत उत्खननास मनाई आहे. माञ, केळझरनजीक केवळ ७० मीटर अंतरावर परवानगी देण्यात आली. यात नियमभंग झाल्याचा आरोप खासदार अपर काळे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित परवानगी तत्काळ रद्द करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्खननाचे कास थांबवावे, अशी मागणी त्यांनी प्रथान सचिवांकडे केली आहे.























































